Type Here to Get Search Results !

सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा;या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन...



राहुरी (प्रतिनिधी) 

सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करून द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने  करावे व दिलेला शब्द पूर्ण करावे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून द्यावे, मागील ५ वर्षात केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबिन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आर्दीच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा २५० रूपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.

            सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरट कंपन्यांचे १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राईट ऑफ केल जात. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते हे अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्य सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपुर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांना रस्त्यावर उतरवून सरकारविरोधात मोठे जनआंदोलन सुरू करून महायुती सरकारला शेतकरी हितासाठी पुढाकार घेण्यास भाग पाडू.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे सुनिल लोंढे,प्रकाश देठे,सतीश पवार,प्रमोद पवार,अनिकेत कुलकर्णी,सुनील इंगळे,अरुण दौले,आनंद वने,भोसले आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments