राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून त्या अनुषंगाने आज राहुरी फॅक्टरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तब्बल ५० हून अधिक विना नंबर दुचाकींवर कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याचशा दुचाकी गाड्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली सदर मोहिमेदरम्यान तब्बल ५० हुन अधिक वाहने विना नंबर प्लेट आढळून आले सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार,पोलिस उप निरीक्षक धर्मराज पाटील,संदीप ठोंबरे,प्रवीण बागुल,जालिंदर धायगुडे,बाबासाहेब शेळके तसेच गृहरक्षक दलाचे,तुषार बोऱ्हाडे,निलेश चव्हाण,गणेश दांगट,गौतम खळेकर,करण बाचकर,कृष्णा गवते,किशोर ढेपे,करण होले आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment
0 Comments