राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
राहुरी फॅक्टरी परिसारात दोन दिवसांपूर्वी नशेली पदार्थाची तस्करी करणारा एक टेंपो मनमाडकडे जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.राञी दरम्यान हा टेंपो तीन ते चार पोलिसांनी राहुरी फॅक्टरी परिसरात पकडला हा टेंपो नशेली पदार्था ऐवजी दुध भेसळीसाठी लागणारे साहित्य घेवून जाणारा टेंपो निघाला.पकडलेल्या टेंपोत दुध भेसळीचे साहित्य असल्याने पोलिसांना आयती शिकार सापडली.राहुरी फॅक्टरी येथिल एका व्यापाऱ्याचा मध्यस्थीने पोलिसांनी 20 लाख रुपयांची तडजोड करुन टेंपो सोडून देण्यात आला.हि तडजोड सुरु असताना याच परिसरातील एक व्यक्ती तेथे थांबला असता त्यास पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याने तडजोडीच्या घटनेला वाचा फुटली आहे.या तडजोडीची राहुरी फॅक्टरी परिसरात जोरदार चर्चा सुरु असून याबाबत राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे चौकशी केली आसता असा कोणताही गुन्हा घडला नाही.या घटने बाबत नागरिक उलट सुलट जी चर्चा करीत आहे.ती अफवा असल्याचे सांगुन या घटने बाबत ज्या नागरिकांना माहिती आहे. त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा असे अवाहन करुन या घटनेतील पोलिसांबाबत माहिती मिळाल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. असे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की,राहुरी फॅक्टरी परिसरात दुध भेसळीच्या साहित्याचा टेंपो पकडून पोलिसांनी 20 लाखाची तडजोड केली असल्याची चर्चा चवीने कैली जात आहे.तडजोड सुरु असताना राहुरी फँक्टरी परिसरातील व्यक्ती तेथे थांबली असता.त्यास पोलिसा चांगलाच चोप दिल्याने या तडजोडीला वाचा फुटली आहे.20 लाखाच्या तडजोडी बाबत राहुरी फॅक्टरी परिसरात जोरदार चर्चा होत असल्याने काही पञकारांनी या घटने बाबत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी संपर्क साधुन शहानिशा केली असता.आशी कोणतीही घटना घडली नाही. दुध भेसळ साहित्य व नशेली पदार्थांबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.असे ठेंगे यांनी सांगितले.
राहुरी फॅक्टरी परिसरात 20 लाखाच्या तडजोडी विषयी सुरु असलेल्या चर्चे बाबत काय असे विचारले असता.नागरिक उलट सुलट चर्चा करीत असतील.ज्या नागरिकांना या घटनेची माहिती असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.त्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले जाईल.या घटनेची माहिती मिळाल्यास त्या पोलिसांवरही कारवाई केली जाईल.असे हि ठेंगे यांनी सांगितले.
तडजोड करणाऱ्या पोलिसांनी माञ दोन दिवस उलटल्या नंतरही गुन्हा दाखल केला नाही.उलट राहुरी फॅक्टरी येथिल मध्यस्थी करणाऱ्या त्या व्यापाऱ्याला काही दिवस बाहेर गावी निघुन जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला असल्याने मध्यस्थी करणारा व्यापारी दोन दिवसापुर्वीच बाहेरगावी निघुन गेला आहे.त्यामुळे या घटनेला अधिक पुष्टी मिळत गेली आहे.
दुध भेसळीचे साहित्य नेमके कोणाचे होते..? पोलिसांना नशेली पदार्थ असलेली टिप देणारा कोण..? मोठ्या तडजोडीमुळे गुन्हा दाखल करण्या ऐवजी तो दुध भेसळीचे साहित्य वाहतुक टेंपो सोडुन देण्यात आला.दुध भेसळीचा टेंपो पकडून तडजोड करणारे ते तीन पोलिस कोण आहेत..?दबक्या आवाजात काही पोलिसांची नावे घेतली जात आहेत.या तडजोडीची चौकशी होणार का..? गुन्हा दाखल न करता दुध भेसळ साहित्याचा टेंपो सोडून देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का..?अशी चर्चा नागरिकांमधुन केली जात आहे.
Post a Comment
0 Comments