देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
देवळाली प्रवरासह 32 गावातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.महावितरणाच्या अधिकाऱ्यांने आमदारांना कोणतीही टिपण्णी दिली नसल्याने आ.हेमंत ओगले यांनी आधिकाऱ्यास फैलावर घेतले. आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही.आमच्या वरीष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन हि बैठक 'अँटेन'(हजर) करीत आहे.यावर आ.ओगले यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलात काय? असा प्रश्न करुन महावितरणाचे उप कार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे यांची खरडपट्टी काढुन चांगलेच धारेवर धरले.आढावा बैठकीत सर्वाधिक महावितरण व अतिक्रमणाचे प्रश्न उपस्थित झाले.नगर पालिकेने विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्याना उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले गाळे वाटप करावे अन्यथा मला बंद गाळ्याचे कुलपे तोडून विस्थापिंना गाळे वाटप करावे लागेल.असा खणखणीत इशारा देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह 32 गावाची स्वतंत्र बैठक देवळाली प्रवरा येथिल समर्थ बाबुराव सांस्कृतिक भवनाणा घेण्यात आली.या बैठसाठी आ.हेमंत ओगले यांच्यासहा करण ससाणे,सचिन गुजर,काँग्रेसचे राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव ,कृष्णा मुसमाडे,दत्ता कडू,बाळासाहेब खांदे,सुरेश निमसे,भागवत मुंगसे,सुखदेव मुसमाडे,पाटील,कुणाल पाटील,मयूर आडागळे,अत्तम कडू,भाऊसाहेब वाळूंज ,ज्ञानेश्वर कोळसे,प्रांतधिकारी किरण सावंत पाटील,तहसिलदार नामदेव पाटील. गट विकास आधिकिरी सुधाकर मुंढे,नायब तहसिलदार सचिन औटी,संध्या दळवी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारो उपस्थित होते.
आढावा बैठक कृषी खात्या पासुन सुरु करण्यात आली.ठिबक सिंचन अनुदान व नोंदणी बाबत प्रश्न उपस्थित केले.महावितरण विभागा बाबत शेतकऱ्यांनी दिवसा पुर्ण दाबाने विज मिळावी असा प्रश्न उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उप कार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे उभे राहिले असता. आ.हेमंत ओगले यांनी महावितरणाची टिपण्णी मिळाली नाही या बाबत विचारणा केली. आ.ओगले यांनी आधिकाऱ्यास फैलावर घेतले.आपल्या बैठकीचे कोणते पत्र मला मिळाले नाही.आमच्या वरीष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन हि बैठक 'अँटेन'(हजर) करीत आहे.यावर आ.ओगले यांनी तुम्ही काय हात हलवत लग्नाला आलात काय? आसा प्रश्न करुन महावितरणाचे उप कार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे यांची खरडपट्टी काढुन चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा,पंचायत समिती बांधकाम विभाग,वन विभाग,जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग,नगर रचना,पोलिस ठाणे,आरोग्य विभागा,महसुल विभाग आदी विभागातील प्रश्न उपस्थित झाले होते.हे सर्व प्रश्न तातडीने सोडविण्यास सांगितले. महाराष्ट्र जिवन प्राधिकरणा अंतर्गत उप अभियंता प्रशांत जाधव यांनी आंबी,अमळनेर,केसापूर,गंगापूर आदी ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजना पुर्ण झाल्याचे सांगितले.माञ या भागातील उपस्थित ग्रामस्थांनी हरकत घेत पाणी योजना चालू झाली म्हणताय तर नळाला पाणी कायेत नाही असा प्रश्न करुन उप अभियंता जाधव यांची बोलती बंद केली.
देवळाली प्रवरा नगर पालिकेने शुक्रवारी काढलेल्या अतिक्रमणा संदर्भात अतिक्रमण धारकांनी प्रश्न उपस्थित करुन आमची रोजी रोटी बंद झाली. आम्ही कर्ज कसे फेडायचे व कुटुंब कसे चालवायचे आमच्या समोर आत्महत्या शिवाय पर्याय नाही. आम्ही विस्थापित झालोय आमची सोय करुन द्या असे सांगत असताना दिनेश भाग्यवान नामक व्यक्तीस अश्रु अनावर झाले.
आ.हेमंत ओगले यांनी तुम्ही अतिक्रमणे काढली आहेत. 40 वर्षापुर्वी केलेले अतिक्रमण आज काढले जात आहे.त्यांच्या पोटावर कुऱ्हाड चालवली आहे.नगर पालिकेचे तयार असलेले गाळे उदघाटनासाठी थांबले आहेत. ते सर्व गाळे विस्थापितांना देण्यात यावे.अन्यथा मला गाळ्याचे कुलपे तोडून गाळ्यांचे वाटप करावे लागेल.असे आ.हेमंत ओगले यांनी पालिका प्रशासनास सांगितले आहे.
आढावा बैठकीच्या समारोपा प्रसंगी आ.हेमंत ओगले यांनी बोलताना सांगितले.तुम्हीच विज पाणी दिली. घरपट्टी घेतली.40 वर्षा पासुन ते त्या जागेवर व्यवसाय करतात तेव्हा तुम्हाला कोणालाही अतिक्रमण दिसले नाही.आजच अतिक्रमण दिसले.छोटे मोठे व्यापारी विस्थापित होवून रस्त्यावर आलेत.त्यांचे पुर्नवसण करण्याची जबाबदारी तुमची आहे.अतिक्रमण संदर्भात मुख्यमंत्री व राज्यपाल,मंत्री मंडळातील सर्व मंत्यांना भेटलो.पण अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही.या सरकारला गोरगरीब जनतेला रस्त्यावर आणायचे आहे.असे आ.ओगले यांनी सांगितले.
या आढावा बैठकीत संदिप खुरुद,ललित चोरडीया,गोरक्षनाथ वाळुंज,धनंजय डोंगरे,भागवत मुंगसे,किशोर मुसमाडे,संजय खपके,बापूसाहेब चव्हाण,प्रविण देशमुख, बाळासाहेब तारडे,श्रीकांत कदम,सुमित मुसमाडे,गोरक्षनाथ नान्नोर आदींनी सहभाग नोंदविला.
तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे,महावितरणाचे उप कार्यकारी अभियंता शैलेंद्र बागिरे,पाणी पुरवठा तुषार परदेशी, पंचायत समिती बांधकाम विभाचे उप अभियंता सुमित घोरपडे,वन विभागाचे युवराज पाचरणे,जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता प्रशांत जाधव,भुमि अभिलेख मनिषा धिवर,आरोग्य विभागा डॉ.दिपाली गायकवाड,महसुल नायब तहसिलदार सचिन औटी, मुख्याधिकारी विकास नवाळे आदींनी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
Post a Comment
0 Comments