राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी पोलिस ठाण्यातील उप कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टॉयलेटचे घाण पाणि फेकल्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवारी सकाळी कैद्यांनी जेलर व पोलिस प्रशासनाच्या विरोधात थाळ्या वाजवून जोरदार घोषणाबाजी केली.यामुळे राहुरी पोलिस प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक शेषराव राजेंद्र कुटे तसेच गणेश सानप,कदम,दिगंबर सोनटक्के हे पोलिस कर्मचारी दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान राहुरी पोलिस ठाण्यातील उप कारागृह येथे गार्ड ड्युटी करत होते. त्यावेळी कारागृहातील चार नंबर कोठडीतील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी पोलिस कर्मचारी शेषराव कुटे यांना शिवीगाळ करु लागले. तेव्हा कुटे हे चार नंबर कोठडी समोर गेले.त्यावेळी तेथील आरोपींनी कुटे यांच्या अंगावर टाॅयलेटचे पाणि टाकले.तसेच तु लय माजला का,आम्ही बाहेर आल्यावर तुझ्याकडे पाहतो.तु कशी काय नोकरी करतो असे म्हणुन कुटे यांना शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना ताजी असताना या कोठडीतील आरोपींनी आज पुन्हा पोलिसांविरोधात थाळीनाद केला आहे.
दि.२६ रोजी उप कारागृहात घडलेल्या घटनेनंतर पोलिस शिपाई शेषराव राजेंद्र कुटे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शशिकांत युवराज सुखदेव,हर्षल ढोकणे, बबलु कुसमुडे,संदीप कुसमुडे यांच्या विरोधात गुन्हा रजि.नं. १६०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३२, ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेला अवघे सहा दिवस झाले असुन याच न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी मंगळवारी सकाळी कैद्यांची जेलर व पोलिस प्रशासनाच्या विरोधात थाळीनाद करुन पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
या कोठडीत असणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांनी खाजगीत पोलिसांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.या पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या जवळच्या एका पोलिसाने मोठी रक्कम घेवून या गुन्ह्यातून सही सलामत बाहेर काढतो असे सांगितले होते.रक्कम घेतल्या नंतर याच पोलिसाने आमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना पोलिसांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली नाही.व आम्ही पोलिसांना पैसे दिलेले नाहीत असे रेकॉर्डिंग करुन घेतल्याने आम्हाला कोठे ही तक्रार करता येत नाही.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पोलिसांविरोधात असंतोष वाढत असल्याने पोलिसांच्या अंगावर घाण पाणी फेकणे,थाळीनाद करणे,शिवीगाळ करणे अशा घटना उप कारागृहात घडू लागल्या आहेत.
Post a Comment
0 Comments