Type Here to Get Search Results !

गुहा येथील रमाई माता प्रतिष्ठान आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सचिन ओहोळ उपाध्यक्षपदी किरण ओहोळ तर खजिनदार पदी धनंजय ओहोळ यांची निवड...


गुहा (प्रतिनिधी) :

राहुरी तालुक्यातील गुहा येथे प्रत्येक वर्षी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

त्यानिमित्ताने यावर्षीच्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गुहा अध्यक्षपदी सचिन ओहोळ यांची उपाध्यक्ष म्हणून किरण ओहोळ तर खजिनदार म्हणून धनंजय ओहोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

यंदाच्या जयंती निमित्ताने गुहा गावातून भव्य दिव्य काढण्यात येणार असून सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन रमाई माता प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments