राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी शहरातील एका शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींची वर्गामध्ये शिक्षकाकडून छेडछाड झाल्याची घटना दि. ७ एप्रिल रोजी उघडकीस आली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
राहुरी शहर हद्दीत संत गाडगे महाराज आश्रम शाळा नाव असलेली शाळा व वसतीगृह आहे. त्या ठिकाणी पहिली ते दहवी पर्यंत शेकडो मुले व मुली वस्तीगृहात राहून शिक्षण घेत आहे. त्या शाळेत आरोपी गणेश तुकाराम खांडवे, रा. राहुरी, हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या आरोपी शिक्षकाने गेल्या काही दिवसांपासून तिसरी व चौथी च्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना वर्गामध्ये जवळ बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवले. तसेच त्या सात ते आठ मुलींशी अश्लील चाळे केले. या बाबत कोणाला काही सांगीतले तर छडीने मार देईल, अशी धमकी दिली. मात्र सदर प्रकार एका मुलीने तीच्या आईला फोन करुन सांगीतला. पालकांनी ताबडतोब शाळेत जाऊन माहिती घेतली. त्यानंतर पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद दाखल केली. त्यानूसार आरोपी गणेश तुकाराम खांडवे, रा. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ३९८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७९ तसेच बालकांचे लैर्गीक अपराधांपासून संरक्षण अधिनियम ८, १०, १२ तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३ (१) (डब्लू) (आय), ३ (१) (डब्लू) (ii), ३ (२) (व्हिए) नूसार छेडछाड, पोस्को व ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुरी पोलीस पथकाने आरोपी शिक्षक गणेश तुकाराम खांडवे याला ताबडतोब अटक करुन जेरबंद केले. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपूजे हे करीत आहे.
Post a Comment
0 Comments