राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रसादनगर येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चिरायू बाल रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ.हर्षद चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे,लेझिम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आले.
यावेळी उमेद सोशल फाउंडेशनचे कुणाल तनपुरे,माजी नगरसेविका कमल सरोदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण जगताप,उपाध्यक्ष शरद साळवे,तसेच विद्यार्थी,पालक परिसरातील नागरिक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments