राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे पाटील यांच्या संकल्पनेतून कनगर ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धांचे आयोजन गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी विजेत्या महिलांसाठी पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांच्या सौजन्याने सोन्याची नथ,सरपंच सर्जेराव घाडगे यांच्या सौजन्याने पैठणी साडी,नवले गुरु यांच्या सौजन्याने बांगडी सेट तसेच खंडू गाढे व सुनील गाढे यांच्या सौजन्याने जेवण डबे व कप सेट आदी आकर्षक भेटवस्तू उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी परिक्षक म्हणून मेहेत्रे मॅडम,शेवाळे मॅडम,जगताप मॅडम,हिना शेख मॅडम यांनी काम पाहिले.
यावेळी कनगरचे भूमिपुत्र सुनिल गाढे पाटील यांची पर्यटन मंत्री शंभू राजे देसाई यांचे ओएसडी म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बाबूराव घाडगे, डॉ.नालकर,सरपंच सर्जेराव घाडगे,उपसरपंच बाळासाहेब गाढे,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब आडभाई,महंमद भाई इनामदार,सिमा घाडगे,छायाताई गाढे,भाऊसाहेब घाडगे,संदिप घाडगे,दादासाहेब घाडगे,चंद्रकला ताई दिवे गोविंदराव दिवे,छायाताई दुशिंग, सुरेखा भांड,आश्विनी पावसे,जालू गागरे,भाऊसाहेब खाटेकर,राजेंद्र दिवे आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments