Type Here to Get Search Results !

देवळाली प्रवरात श्री.साई प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिना निमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान...


देवळाली प्रवरा(प्रतिनिधी) :

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीय आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवात आज दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.

दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साई प्रतिष्ठानच्यावतीने भव्य दिव्य साई पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.यंदाही मोठ्या भक्तिमय वातावरणात साई उत्सवास प्रारंभ झाला आहे.
या उत्सवात मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवाना साई डायरी व शॉल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सर्वश्री पत्रकार सोपान चौधरी,गीताराम शेटे,रफिक शेख,चंद्रकांत लासुरकर,हेमंत मिसाळ,गणेश अंबिलवादे,विलास कुलकर्णी,गणेश विघे,अशोक काळे,श्रीकांत जाधव,मुकेश वाळके,खालिद शेख,पप्पू चित्ते,आशिष संसारे,चेतन कदम,नानासाहेब उंडे,संजय देठे आदी पत्रकार उपस्थित होते.

प्रसंगी साई प्रतिष्ठानचे सदस्य व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments