Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरीतील तो स्वयंघोषित व्यापारी संघटनेचा नेता मार खाता खाता वाचला..?


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

देवळाली प्रवरा नगर परिषदेने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसा बजविल्या असुन व्यापाऱ्यांनी स्वतःहुन अतिक्रमण काढुन घेत राहुरी फॅक्टरी येथिल कारखान्याच्या जागेत आपल्या टपऱ्या ठेवल्या असताना येथिल आपल्या उलट सुलट पारनाम्यांनी कायम चर्चेत असणाऱ्या हरी ओम करनाऱ्या व्यापारी संघटनेच्या एका स्वयंघोषित नेत्याने या व्यापाऱ्यांना कारखाना जागेत टपऱ्या लावण्यास विरोध करुन मला ठराविक भाडे देणार असेल तरच टपऱ्या लावा नाहीतर प्रशासनास येथुन टपऱ्या काढण्यास लावील असे बोलला असता येथिल टपरीधारक व स्वयंघोषित नेत्या मध्ये वाद निर्माण झाला.मार खाता खाता हा स्वयंघोषित व्यापारी नेता बालबाल वाचला आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथिल १२१ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावल्या असून सदर  अतिक्रमण स्वतःहुन काढण्यासाठी ७ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.आपले नुकसान नको म्हणुन काही व्यापारी स्वतःहुन अतिक्रमण काढुन घेत असताना राहुरी फॅक्टरी येथिल नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढुन कारखान्याच्या जागेत आपल्या टपऱ्या ठेवल्या आहे.येथिल एका स्वयंघोषित व्यापारी संघटनेच्या नेत्याने कारखाना जागेत टपऱ्या ठेवण्यास विरोध करून हरी ओम म्हणत ठराविक भाडे मला देणार असेल तरच या जागेवर टपऱ्या ठेवता येतिल असे हा स्वयघोषित नेता विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना म्हणला असता या नेत्या बरोबर बाचाबाची झाली अन् व्यापारी संघटनेचा स्वयंघोषित नेता या ठिकाणी मार खाता खाता वाचला.

विस्थापित झालेले व्यापारी कारखाना कामगारांची मुले आहेत.कारखाना बंद असल्याने कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी छोटे व्यवसाय करीत आहे.परंतू अतिक्रमणामुळे विस्थापित होत असल्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.

Post a Comment

0 Comments