Type Here to Get Search Results !

राहुरी तालुक्यात अवैध धंदे तेजीत ; अर्थकारणामुळे पोलीस निरीक्षकांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय.?


राहुरी (प्रतिनिधी) :

राहुरी पोलीस ठाण्यात निरीक्षक संजय ठेंगे हजर झाले त्यावेळी गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरणारे पोलिस निरीक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.गुन्हा कोणताही असो त्या गुन्ह्यातील आरोपींची धिंड काढली जायची.त्यामुळे गुन्हेगार व अवैध धंदे चालकांमध्ये नविन अधिकाऱ्यांबद्दल धास्ती निर्माण झाली होती.परंतू हे सर्व चालले ते नव्याचे नऊ दिवस अन् तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले.अवैध धंदे तर राजरोसपणे चालवली जात आहे.आता नागरिकांना अस वाटायला लागलं की राहुरीत चालले तरी काय कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला.अर्थकरणापुढे कायद्याचा धाकही नरमला आहे.

राहुरी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार संजय ठेंगे यांनी स्वीकारल्या नंतर सुरवातील ठेंगे यांनी गुन्हेगारीसाठी कायदा कर्दनकाळ असतो हे दाखवून दिले.कालंतराने मात्र गुन्हेगारीचे अर्थकरण सुरु झाल्यानंतर गुन्हेगारीवरील वचक कमी होण्यास सुरवात झाली.राहुरी तालुका या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत येत असून राहुरी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी व त्याचबरोबर ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे अशक्य झाले आहे.  

राहुरी फॅक्टरी परिसरात तर गेल्या महिण्यापासुन एका पाठोपाठ चोऱ्याचे सत्र सुरु असून चोरट्यांनी जणू घरफोडीची मालिकाच सुरू केली आहे.किराणा दुकानातून देशी विदेशी व हातभट्टी तसेच मटक्याचा व गांजाची राजरोसपणे विक्री केली जाते.

नागरिकांमध्ये पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सुरवातीला शिस्तप्रिय अधिकारी म्हणून क्रेझ निर्माण केली.परंतू काही दिवसातच तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात रहदारीच्या रस्त्याच्या कडेला अवैध धंद्यावाल्यांनी अवैध धंदे सुरु केलेत.या अवैध धंद्याच्या ठिकाणा पासुन जाता येताना महिला जिव मुठीत घेवून चालतात.

अवैध धंद्यामुळे कायदा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांची शहरातून तसेच गावातून मिरवणूक काढून गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे राहुरी तालुक्यातील जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले आहे.त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना  तालुक्याला चांगला अधिकारी भेटला असे वाटले.तशी प्रतिक्रिया देखील नागरिकांतून व्यक्त होत होती.परंतु राहुरी तालुक्यात वाढलेल्या घरफोड्या,चोऱ्या,खुन,दरोडे, वेश्या व्यवसाय,अवैध दारू मटका हातभट्टी दारू वाढती सावकारी तसेच तालुक्याच्या विविध भागात खुन करुन आणून टाकलेले मृतदेहाचा एकही तपास लावता आला नाही.गुन्हेगारीवरील अंकुश कमी  झाल्याने गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे.

राहुरी पोलिस ठाण्यात तपासाच्या नावा खाली,एक स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आहे.हे पथक गुन्ह्याचा तपास करताना अनेक नागरिकांना  गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून लाखो रुपये उकळण्याचे काम या पथकातील दोन पोलिसांकडे सोपवीले गेले आहे. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा जणू फायदा घेण्याचे काम या पथकातील तीन ते चार जण करताना दिसून येत आहेत.

राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या बदलीसाठी काही संघटना आक्रमक झाल्या असून.नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेवून तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालून पोलिस  निरीक्षकांची बदलीची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments