Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरीत बुधवारी संत शिरोमणी वामनभाऊ महाराज ; यांचा ४९ वा पुण्यतिथी सोहळा...


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री.क्षेत्र गहिनीनाथ गड येथील महंत सद्गुरू श्री वामनभाऊ महाराज यांचा ४८ वा पुण्यतिथी सोहळा बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत साजरा केला जाणार असून.त्या निमित्ताने श्री.क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प विठ्ठल महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य जाहीर हरी कीर्तन होणार असून त्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अंबिकानगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments