राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ.बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात व कारखाना पुढील हंगामात चालू व्हावा यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी,सभासद,कामगार,व्यापारी,छोटे-मोठे उद्योग
व्यवसायिक यांच्या हितासाठी विचार विनिमय करण्यासाठी उद्या मंगळवार ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राहुरी तालुका बचाव कृती समितीच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. तनपुरे साखर कारखान्याची मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.आजमितीला तनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने सभासद व कामगारांचे भवितव्य अधांतरी झाले आहे.कारखाना निवडणूक व गळीत हंगाम चालू व्हावा याबाबत चर्चा करण्यासाठी राहुरी स्टेशन रोड,पांडुरंग लॉन्स येथे राहुरी तालुका बचाव कृती समितीच्या वतीने जाहीर मेळावा बोलाविण्यात आला आहे.
तरी या मेळाव्यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक,शेतकरी,सभासद,कामगार,व्यापारी व छोटे मोठे उद्योग व्यवसायिक तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन आजी-माजी चेअरमन,व्हा.चेअरमन पदाधिकारी व सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून कारखाना हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपले विचार मांडावेत. या मेळाव्यासाठी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ,अरुण कडू, राजूभाऊ शेटे,पंढरीनाथ पवार,भरत पेरणे संजय पोटे,दिलीप इंगळे आदिंसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments