राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी तहसील आवारात असलेल्या धान्य गोडाऊनला तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत या मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार यांना देऊनही निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने बहुजन युथ पॅंथरच्या जिल्हाध्यक्ष यमुनाताई भालेराव यांनी आज सोमवार दिनांक 3 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
राहुरी तहसील आवारात असणाऱ्या तीन अन्नधान्याच्या गोडाऊन मधून जास्त प्रमाणात धान्याचा साठा लंपास होत असून या तिन्ही गोडाऊनला आतल्या तसेच बाहेरील बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच या तीनही गोडाऊनमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या कोठ्याची व कोठ्या संदर्भात असणारा सर्व लेखाजोखा याची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन युद्ध पँथर जिल्हाध्यक्ष यमुनाताई भालेराव यांनी उपोषण सुरू केले आहे.
Post a Comment
0 Comments