देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील बहुतांशी गावात अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या कडेला चालणारे अवैध धंदे मोडीत निघतील अशी अशा विशेषतः महिलांना होती.परंतू आज मात्र अवैध धंदे चालकांनी उघड्यावर अवैध धंदे सुरु केले असून याचे उत्तम उदाहरण देवळाली प्रवरात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उघड्या डोळ्याने पाहिले असले तरी कारवाई मात्र करुच शकले नाही.उलट पोलिसांची गाडी त्या रस्त्यावर आली असता आपण घाबरायचे नाही.आपण काय फुकट धंदा करीत नाही.महिण्याला हप्ता द्यावा लागतो.असे मोठ्या आवाजात अवैध धंदे चालकाच्या लीडरने सांगितले.ते पोलिस निरीक्षक ठेंगे यांनीही ऐकल्याने अवैध धंदे चालकांचा "ऐ पैसा बोलता है" पोलिस निरीक्षकांना ही अवैध पैशा मुळे अवैध धंद्यावाल्यांना शहाणपण दाखवता आले नाही.अखेर देवळाली प्रवरा नगर परिषदेतील राहुरी फॅक्टरी येथील एका मस्जिदी संदर्भातील बैठक अटोपून दुसऱ्या मार्गाने राहुरीला जावे लागले.
याबाबत प्रत्यक्षदर्शी पहाणाऱ्या व्यक्तीने डोळ्याने पाहिली व कानाने ऐकलेली घटना पत्रकारांना सांगितली.त्यानेही सांगताना हसत सांगितले की पोलिसांपेक्षा अवैध धंदे चालकांचा दरारा भारीच राव..!
त्याचे असे झाले.बुधवारी दि.५ रोजी सकाळी १०;३० वाजता राहुरी देवळाली प्रवरा नगर परिषदेत राहुरी फॅक्टरी येथिल एका मस्जिदी संदर्भातील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे जेव्हा बाजारतळावरुन नगरपरिषदेकडे शासकीय वाहनाने जात असताना बाबुराव पाटील मंदिराजवळ पोलिस गाडी येताच अवैध धंदे चालकातील एक जण मोठ्याने आवाज देवून "ये पळा रे पोलिस गाडी आली."अवैध धंदे चालकांचा लिडर तेथेच उभा होता.कोणीही पळायचे आपण काय फुकट धंदा करतोय का.?असा प्रश्न त्या लीडरने अवैध धंदे चालकांना केला.त्यावर अवैध धंदे चालकही आपल्या धंद्यावर ठामपणे उभे राहिले.कायद्याचा धाक येथे चालत नाही. कायद्यापेक्षा पैसा मोठा आहे.हे उघड्या डोळ्याने पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी पाहिले.ठेंगे यांचा धाक मात्र कालच्या प्रकारातून संपल्या सारखा वाटत आहे.?
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्याने पाहुनही डोळे झाकुन पालिकेत पोहचावे लागले.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत मुख्याधिकारी विकास नवाळे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह राहुरी फॅक्टरी येथिल मुस्लिम समाजाचे आठ दहा जणांची एकत्रित बैठक झाली.राहुरी फॅक्टरी येथिल मस्जिदी संदर्भात तीन तास चर्चा करण्यात आली.पालिकेत झालेल्या बैठकीतील चर्चा मात्र समजू शकली नाही.बैठकी नंतर पोलिस निरीक्षक ठेंगे राहुरीला जाताना अवैध धंदे असणाऱ्या रस्त्याने न जाता दुसऱ्या मार्गाने गेले.यावरुन त्या मार्गाने जाताना पुन्हा डोळे झाकण्याची वेळ नको म्हणून पर्यायी मार्ग ठेंगे यांनी निवडला असावा.
एकंदर पोलिसांचा धाक राहुरी तालुक्यात कमी झाला असुन अवैध धंदे चालक राजरोजपणे "फुकट धंदा करीत नाही;महिण्याला पैसे मोजतोय" असे जाहिरपणे सांगत असल्याने कायद्यापेक्षा पैसा मोठा आहे.हे उघड झाले आहे.
उघड्या डोळ्याने पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी अवैध धंदे चालक अवैध व्यवसाय उघड्यावर करीत असल्याचे पाहिले.मात्र यातून समाजामध्ये एकच संदेश गेला तो म्हणजे पोलिस निरीक्षक ठेंगे यांचा धाक संपला..?
Post a Comment
0 Comments