देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या देवळाली प्रवरा येथील सेंट मेरी युवक मंडळाच्या वतीने उद्या रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश राऊत,येशू मारिया सदन राहुरी फॅक्टरी येथील सिस्टर सुपेरिअर सि.तारा ओहोळ,आशांकुर सेवा संस्था भोकर येथील सि.प्रिस्का,आदर्श माता श्रीमती.सगुणाबाई मार्शल संसारे,माजी नगरसेविका सुनीताताई सुरेंद्र थोरात आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तरी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सेंट मेरी युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments