देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
१४ एप्रिल रोजी रोजी होत असलेल्या महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त देवळाली प्रवरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत यंदाचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,देवळाली प्रवराची स्थापन करण्यात आली आहे.
१४ एप्रिल २०२५ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सर्वत्र साजरा होणार आहे.त्या निमित्त देवळाली प्रवरा येथील राजवाडा येथे आर.पी.आय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात,राजू थोरात,किशोर पंडित,दादाभाऊ होले तसेच सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळ,आदर्श तरुण मंडळ,सेंट मेरी युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते आदिंसह देवळाली प्रवरा परिसरातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
त्यानूसार देवळाली प्रवरा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप पंडित,उपाध्यक्षपदी आकाश संसारे,खजिनदार पदी सागर संसारे तर सह खजिनदार पदी सचिन बोर्डे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी जयंती उत्सवा दरम्यान होणारे उत्सव,मिरवणूक,संविधान जागर सोहळा तसेच देवळाली प्रवरा राजवाडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
Post a Comment
0 Comments