राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री साई चरित् पारायण सोहळा व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कीर्तन महोत्सवाचा ध्वजारोहण सोहळा आज श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती ह.भ.प.अर्जुनजी महाराज तनपुरे,संत कवी महिपती महाराज यांचे वंशज ह.भ.प.बाळकृष्ण महाराज कांबळे,ह.भ.प.वाळुंज महाराज,ह.भ.प.बाबा महाराज मोरे,साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन,दिलीप तनपुरे,उद्योजक वृषभ लोढा,पिंटू सोनी,हर्षद ताथेड,मा.नगरसेवक प्रदीप गरड,गुरुवर्य सुरेश आण्णा चव्हाण,अजित येवले,रामेश्वर तोडमल,हॉटेल साई समाधानचे सर्वेसर्व दत्ता दरंदले,दत्ता साळुंके,डॉ.संदीप मुसमाडे,नितीन डंबाळे,सुरेश मोरे,वृषभ संचेती आदींसह शांती चौक मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक ७ एप्रिल ते सोमवार दिनांक १४ एप्रिल या कालावधीत महंत ह.भ प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली श्री साई चरित् पारायण सोहळ्याचे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments