Type Here to Get Search Results !

आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मा वाटप...


देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :

अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण तथा देवळाली प्रवरा गावचे सुपुत्र आरपीआय जिल्हाध्यक्ष व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे लोकप्रिय माजी नगरसेवक सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवार दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे.

तसेच सायंकाळी ६ वाजता ह.भ. प शालिनीताई इंदुरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन पार पाडणार असून त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी मोफत नेत्र तपासणी शिबिरास व जाहीर हरिकीर्तनास उपस्थित राहावे असे आवाहन सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments