राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली असता आज आ.हेमंत ओगले यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री.वैभव कलबुर्मे यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी तसेच सामाजिक वातावरण गडूळ करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री.करणदादा ससाणे,शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त श्री.सचिन गुजर,अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सभापतीश्री.बाबासाहेब दिघे,माजी.सनदी अधिकारी दत्ता कडू,श्री.वैभव गिरमे,कुणाल पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments