राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :
नगर मनमाड माहामार्गावर असलेल्या राहुरी फॅक्टरी येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दारुच्या नशेत असल्याने कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तीन वेगवेगळ्या वाहनांना उडवून कंटेनर थेट हॉटेल प्रयाग मध्ये घुसला या घटनेने हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.राहुरी तालुक्यातील बाचकर कुटुंब या अपघातातून बालबाल बचावले आहे.तब्बल तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर कंटेनरचा चालक व वाहक यांना कंटेनरमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले.या दोघांवर राहुरी फॅक्टरी येथिल श्री विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचार सुरु आहेत.दुपारची वेळ असल्या कारणाने हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते जर ग्राहक असते तर अनेक मद्यपींचा आज शेवटचा पेग ठरला असता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज गुरवारी दुपारी ३ वा.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाचा राहुरी फॅक्टरी येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून राहुरीच्या दिशेने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एम.एच.१२ व्ही.सी.१२९१ या कारला धडक देवून पुढे उभ्या असलेल्या प्रवाशी रिक्षा एम.एच.१२ एम.ओ. ७९८९ धडक देवून हॉटेल प्रयागच्या समोर उभी असलेली मोटार सायकल एम.एच. १६ डब्लू. १२९१ ला धडक देवून कंटेनर थेट हॉटेल मध्ये स्वयंपाकगृहापर्यंत घुसल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.
राहुरी फॅक्टरी येथिल तरुणांनी तीन तासाच्या अथक परिश्रमाने प्रयत्नांची पराकष्ट करुन कंटेनर चालक व वाहक यांना सुखरुप बाहेर काढले.कंटेनर चालक नवनाथ अर्जुन आघाव (रा.बारगाव नांदुर ता.राहुरी )यास प्रथम बाहेर काढण्यात आले.त्यानंतर कंटेनर वाहक विकास गहिनीनाथ गर्जे (रा.बीड) यास बाहेर काढण्यात आले.या दोघांनाही रविंद्र देवगिरे व पप्पू कांबळे या दोघांच्या रुग्णवाहीकेतून उपचारासाठी राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले.
अपघात घडल्याची माहिती राहुरी पोलिस ठाण्यात देण्यात आली असतानाही पोलिस मात्र घटनास्थळी तब्बल तीन तासांनी आले.अपघातस्थळी मदत कार्य करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी रुबाब दाखविण्यास सुरवात केली पण पोलिस मदत कार्यात सहभागी झाले नाही.ज्या तरुणांनी मदत केली त्यांच्या बद्दल कौतुकाचे शब्द काढण्या ऐवजी पोलिसांच्या दादागिरीमुळे तरुणांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
यावेळी मयूर कदम,पप्पू बर्डे,सतिष डुक्रे,प्रमोद विधाटे,निखिल शिंदे,अमोल आपटे,गिरीष कदम,लाला इनामदार,सतिष मोरे,अमोल साठे,गोरख नरोडे,नाना लोखंडे,राजेंद्र सिनारे,दादा वाणी, अभिजित दोंदे,आकाश जोगदंड आदी मदत कार्यात सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments