Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरीच्या त्या दोन बीट हवालदारांनी अटक वॉरंटच्या नावाखाली बागुलबुवा करून केली हजारो रुपयांची वसुली..!


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

तुझा बाप कोर्टात तारखेला हजर राहिला नाही त्याचं अटक वॉरंट आहे.कुणाला काहीही न सांगता लवकर ५ हजार रुपयांची सोय कर "साहेबांना द्यावे लागतील..!" नाही तर आज शनिवार अन् उद्या रविवार सुट्टी असे २/३ दिवस तुझ्या बापाला जेल मध्ये बसावे लागणार असा बागुलबुवा राहुरी फॅक्टरीच्या त्या दोन बीट हवालदारांनी राहुरी फॅक्टरीतील एका गरीब घरातील तरुणाला केल्याने आपला बाप आता जेलमध्ये बसणार या भीतीने घाबरलेल्या तरुणाने रात्री १० वाजेपर्यंत फिरून उसने पासणे पैसे पाहून त्या दोन बीट हवालदारांना त्यांचा राहुरी फॅक्टरीतील कारभार पाहणाऱ्या खाजगी हस्तकाकडे दिले. असाच प्रकार राहुरी फॅक्टरी परिसरातील अन्य तीन चार नागरिकांच्या बाबतीत काल शनिवारी घडला आहे.

राहुरी फॅक्टरी बिटला नेमणूक असलेले हे दोन हवालदार दादा कधीही राहुरी फॅक्टरी परिसरात फिरकताना दिसत नाही परंतु शनिवार व रविवार असे सुट्टीचे दिवस शोधून राहुरी फॅक्टरी परिसरातीलच त्यांच्या हस्तकामार्फत कायद्याची भीती दाखवून मोठ्या प्रमाणात माया वसुली करताना दिसून येत आहेत.

या दोन हवालदार दादांनी राहुरी फॅक्टरी बीटचा कारभार स्वीकारल्यापासून आपल्या सक्तीच्या वसुलीसाठी खाजगी हस्तकांची नेमणूक केली असून त्यांना जणू राहुरी फॅक्टरी परिसरात टेहळणी करून अवैद्य मार्गाने पैसे वसुली करण्याचे कामच यांनी दिले आहे.

हे दोन पोलिस दादा आपल्या हस्तकांमार्फत राहुरी फॅक्टरी परिसरातून दरमहा हजारो रुपयांची पठाणी वसुली करत असून संबंधित बीट हवालदार यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेश ओला यांनी चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातून होत आहे.

Post a Comment

0 Comments