Type Here to Get Search Results !

डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांचा कामगार मेळावा संपन्न..!


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) :

राहुरी तालुक्याची कामधेनु असलेल्या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा मेळावा २७ एप्रिल रोजी लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रारंगणात संपन्न झाला या मेळाव्यात अनेक कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात कामगार युनियन सेक्रेटरी सचिन काळे गुरु म्हणाले की,बंद पडलेल्या कारखाना साठी एवढ्या अर्जांची विक्री होते.एवढे पॅनल उभे राहतात याच अर्थ या बंद पडलेल्या कामधेनूमध्ये मोठे काही तरी घबाड आहे.कामगारांची जी थकीत रक्कम आहे ती मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे आंदोलने केलीत.१९९८ पासून २०२२ पर्यंत कामगारांची ग्रेजुटी बोनस थकीत पगार असे सगळे धरून १३८ कोटी रक्कम थकीत आहेत.जो तो म्हणतो कारखाना चालू झालं पाहिजे पण नेमका कुणासाठी चालू झाला पाहिजे हे पण महत्वाचे आहे.जो पुढारी उठतो तो कामगारांना दोष देतो.कामगारांची रक्कम ही बँक इतकी मोठी आहे.त्याला कधी विचारात घेतले जात नाही गेल्या वीस वर्षात सर्वच मंडळांनी कामगारांची फसवणूक केली आहे.आता कुठेतरी एकत्र येऊन  कामगारांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.कामगारांचं ३००० मतदान आहे.सभासदांच फक्त १५०० ते १६०० मतदान आहे.कामगारांची वेळोवेळी फसगतच झाली आहे.कितीही अन् कोणतेही पॅनल तयार होऊ द्या पण कामगारांचं थकीत देणं देण्यासाठी सर्वजण उदासीन आहेत.गेल्या २० वर्षांपासून कामगारांची सगळ्या मंडळांनी फसवणूक केली आहे.कामगारांकड ३००० मतदान आहे त्याचा सर्व पुढाऱ्यांनी धसका घेतला आहे.तीन वर्षापासून कारखाना बंद असल्याने कामगारांची काय दुर्दशा आहे नेते मंडळाला माहिती आहे का ?

यावेळी बोलताना वसंतराव मुसमाडे म्हणाले की,जेव्हा कामगारांनी गेटवर उपोषण केलं तेव्हा आमदार कर्डिले यांनी आश्वासन दिलं होत की तुमचे  पगार करू पण दिलेले शब्द त्यांनी पाळला नाही.

यावेळी बोलताना बंगाळ साहेब म्हणाले की,नेते मंडळ एकदा खुर्चीत बसले की ते कामगारांना कोलून देत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्वांनी एकजूट राहणं गरजेचं आहे.सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची आत्ता ही योग्य वेळ आली आहे.या पुढाऱ्यांनमुळे  घरात स्वाभिमान जगता येत नाही मुलांना खाली  मान घालून पैसे मागण्याची वेळ कामगारांवर आली आहे.सेवानिवृत्त कामगारांचे फंडाचे पैसे आले असते तर ही वेळ आली नसती.यात तर काही कामगार हे स्वर्गवासी झाले आहेत तर काही कामगार अजूनही एक उम्मीद घेऊन जगत आहे की कारखाना चालू होईल कोणीतरी कारखान्याचा वाली होईल परंतु कोणतेही मंडळ कामगारांचा वाली झालेला नाही म्हणून आज साखर कामगार युनियनच्या वतीने कोणालाही पाठिंबा न देता स्वतः कारखाना मतदानाच्या रिंगणात उतरण्याचा कामगारांनी निर्णय घेतला आहे.

यावेळी युनियनचे सेक्रेटरी सचिन काळे वसंतराव मुसमाडे सोपान घोरपडे रफिक सय्यद बंगाल साहेब भरत पेरणे विठ्ठल म्हसे चंद्रकांत कराळे इंद्रभान नाना पेरणे खुळे मामा वसंतराव मुसमाडे बंगाल साहेब रावसाहेब आल्हाट आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी असंख्य कामगार उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments