देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देवळाली प्रवरा गटातून शेतकरी विकास मंडळाच्या वतीने मा.श्री.राजू भाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील सुशिक्षित युवा नेतृत्व गणेश राजेंद्र मुसमाडे यांचा उमेदवारी अर्ज आज सोमवारी सभासद व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
यावेळी शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे,राजेंद्र मुसमाडे,शंकर मुसमाडे,विजय मुसमाडे,अमोल मुसमाडे,दगडू कडू,बाळासाहेब गाडे,संदीप आढाव,आदिनाथ कडू,बबलू घाडगे,अजय गोसावी,नारायण घाडगे,सागर झावरे,माऊली भागवत,मयूर भोसले आदींसह सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments