राहुरी (प्रतिनिधी) :
राहुरी येथील न्यायालयात इलेक्ट्रिक मोटर चोरीच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मल्हारवाडी रोडच्या कडेला राहुरी बु | शिवारात फिर्यादीच्या विहिरीतील इलेक्ट्रिक हॉर्स पावरची पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरून नेली या रूपातून आरोपीची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.याप्रकरणी फिर्यादीने राहुरी पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरुद्ध चोरीची फिर्याद दिली होती. राहुरी पोलिसांनी सदरची फिर्याद नोंदवून घेतली व त्यास गु.र.नं.६०/२००९ असा क्रमांक दिला.व भा.दं.वी.चे कलम ३७९/३४ अन्वये दि.३/३/२००९ रोजी गुन्हा दाखल केला होता.सदर तपास तपासी अधिकाऱ्याकडे देण्यात आला.तपासी अधिकाऱ्याने केसचा तपास करून साक्षीदारांचे जबाब घेऊन पंचनामे करून सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र तयार करून मे.न्यायालयात सदर केले.सदर खटल्याचा आर.सी.सी.नंबर ९५/२००९ असा पडला. सदर खटला राहुरी येथील सह दिवानी व फौजदारी न्यायाधीश मयूरसिंह गौतम साहेब यांचे समोर चालला.
आरोपीतर्फे ज्येष्ठविधीज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांनी काम पाहिले.सदर खटला गुणोशावर चालवून साक्षीदारांचे जबाब झाले व सबळ पुराव्याअभावी आरोपी नामे सतीश राजू भालेराव याची दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी मे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
Post a Comment
0 Comments