Type Here to Get Search Results !

राहुरी फॅक्टरी येथिल तरुणाला गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसांसह पोलिसांनी घेतले ताब्यात...


राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
 
राहुरी फॅक्टरी परिसरातील गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज (वय-24) याला अवैध गावठी कट्टा बाळगताना शनिवारी राञी १० वाजता रंगेहाथ पकडण्यात आले.देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले.सदर तरुणाविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,शनिवारी रात्री गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक इसम देसी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकादेशीर विना परवाना स्वतःजवळ बाळगत आहे.मिळाल्याने बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शनिवारी रात्री १० च्या सुमारास तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथकाने राहुरी फॅक्टरी येथिल श्री.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सापळा लावला यावेळी पुतळ्याजवळ  गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज (वय-24 वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी) हा तेथे आला असता पोलीसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची जागेवर झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग  वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग डॉ.बसवराज शिवपुजे  यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली  साहय्यक पोलिस उप निरीक्षक तुळशीराम गीते,पो. हे. कॉ. बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पो. कॉ. प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, नदीम शेख, अमोल भांड, भाऊसाहेब शिरसाट आदींनी केली आहे.

Post a Comment

0 Comments