देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) :
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त निमित्ताने देवळाली प्रवरा येथील राजवाडा चौक येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी माजी नगरसेविका सुनीता थोरात,स्नेहल दिवे,कुमार भिंगारे आदींसह महिलांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार भिंगारे यांनी केले तर आभार माजी नगरसेविका सुनीता थोरात यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संविधान ग्रुप तसेच सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळ देवळाली प्रवरा यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments